शास्त्र म्हणजे विज्ञान, विज्ञान पुराव्यावर आधारित असते, जेवढा जास्त पुरावा तेवढा जास्त विश्वास, आणि जेवढा जास्त विश्वास तेवढे सत्य..........,
ज्योतिषाला शास्त्र का म्हणायचे? ज्योतिष विज्ञान होऊ शकत नाही, कारण विज्ञान (निरीक्षण-तर्क-अनुमान-प्रचीती-प्रयोग) या मार्गाने पडताळले जाते, आणि या मार्गाने ज्योतिष हे शास्त्र कधीच सिद्ध होऊ शकत नाही. ज्योतिष म्हणजे स्वप्न विकण्याची कला आहे, अशी ज्योतिषाची व्याख्या काही समाजसुधारकांनी पूर्वी केली आहे, आणि ते सत्य आहे.
ज्योतिष पाहणारे आणि विश्वास ठेवणारे, हे ज्योतिषाचे ग्राहक आहेत, ग्राहकाला जर ज्योतिषाकडून चुकीच ज्योतिष सांगितलं गेलं किंव्हा सांगितलेलं भविष्य खोट ठरले तर त्याला ग्राहक न्यालयात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची तरतूद हवी आणि याला ज्योतिषांनी मान्य करावी कारण त्यांचा त्यांच्या विद्येवर प्रचंड विश्वास आहे, आणि जर त्यांना हे स्वीकारायचे नसेल तर त्यांनी भविष्य विकायचे सोडावे.

No comments:
Post a Comment